About us

  पाटणकर विवाह संस्थेचे संस्थापक कै.श्री.आनंदराव बाबुराव पाटणकर ( दादा ) हे कोल्हापुर महानगर पालिका येथे ऑक्ट्रॉय विभागामध्ये नोकरीस होते. "दादा" नोकरी सांभाळुन कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील दुकानदारांना बीबी जावा ह्या दुचाकी वरुन होलसेल दरामध्ये तंबाखू विक्री करत असत. त्यावरुन त्यांची "तंबाखुवाले" म्हणुन सुद्धा ओळख होती. सन १९९०-९१ मध्ये तब्येतीच्या कारणास्तव "दादानी" नोकरी व व्यवसायामधुन स्वेच्छा निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर "दादा" कडे भरपुर रिकामा वेळ होता. या रिकाम्या वेळेचा. उपयोग समाजासाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटे.
  "दादाचे" शिवाजी पेठेतील जिवलग मित्र श्री. चंद्रकांत सरनाईक ( पेगम ) यांच्या घरी येणे जाणे होते. त्यावेळी सरनाईकांच्या घरी लग्नाची मुलगी होती. त्या मुलीसाठी स्थळ बघण्यास सांगुन त्यांच्या मित्राने "दादा" कडे त्या मुलीचा बायोडाटा दिला . त्या मधुन " पाटणकर विवाह संस्थेची मुहुर्तमेढ रोवली गेली." त्यावेळी मुलींच्या लग्नासाठी विशेष प्रयत्न करावे लागत असे. श्री सरनाईक यांच्या मुलीस स्थळे बघताना "दादांकडे" इतर मुला मुलींचे बायोडाटे येऊ लागले.
  "दादा" चा रोकठोक, निर्भिड, सरळमार्गी तसेच प्रामाणिक स्वभावामुळे "दादाच्या" निव्वळ शब्दावर अनेक विवाह जुळुन यशस्वी झाले. विवाह जुळल्यानंतर कोणत्याही प्रकारचे मानधन व आहेर "दादा" स्विकारत नसत. इतकेच काय तर त्यांनी ठरविलेल्या लग्नात सुद्धा ते कधी जात नसत. यामधुनच मराठा समाजासाठी सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असणारी "पी.अानंद" यांची स्वच्छ व पारदर्शक पाटणकर विवाह संस्था म्हणुन अल्पवधीतच कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.
  "दादाची" स्मरणशक्ती अचाट होती. कोणत्या मुलामुलीचा बायोडाटा कोणत्या फाईलमध्ये आहे व तो कोणत्या स्थळास योग्य आहे हे "दादा" अगदी बिनचुक सांगत असत. हे कार्य करत असतानाच "दादानी" कोल्हापूर शहराबरोबरच, ऐतिहासिक पन्हाळा गड, श्री क्षेत्र जोतिबा देवालय या ठिकाणी स्वतः निवडलेल्या बिया रोऊन त्याला खतपाणी घालून ते वृक्ष जगवले.वृक्षाची निवड करताना सुद्धा त्यांचा कटाक्ष असा असे की जे वृक्ष औषधी व ज्या वृक्षाला लागणारी फळे पक्ष्यांच्या चोचीमध्ये मावतील अशीच असंख्य वृक्ष "दादानी" लावून जगवली. या कार्याची कोल्हापूर जिल्ह्यातील बी न्यूज डिजिटल मिडिया बरोबरच दैनिक पुढारी, सकाळ, तरुण भारत, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, पुण्यनगरी तसेच काही साप्ताहिक, मासीक व दिवाळी अंक यांनी नोंद घेतली. ह्या बरोबरच "दादा" शहरातील नागरी समस्या वर दैनिक वृत्तपत्रामधुन लिखाण करुन त्या प्रशासणाच्या निर्दंशणास अाणुन देत.
  "दादानां" इतिहासाची फार आवड होती. त्यांनी छ. शिवाजी महाराज, जिजाऊ, छ. संभाजीराजे, ताराराणी, छ. शाहू महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकें वाचली. त्याचबरोबर "दादांना" मराठी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ यांच्या बद्दल अभिमान होता. दि.२८ जानेवारी २०१७ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८३व्या वर्षी "दादाचे" दुःखद निधन झाले. काळानुसार बदल तसेच लोकांच्या गरजा अपेक्षा यांचा विचार करीत त्यांच्या कार्याचा वसा त्यांचे सुपुत्र श्री.संजय आनंदराव पाटणकर यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकीतून पुढे चालू ठेवला आहे.